महामंगल सुत्तातील बुध्द वचने |

मला उपलब्ध वाङमयाद्वारे धर्मासंबंधी जे ज्ञान प्राप्त झाले. त्याचे सर्वासाठी विवरण करावे असे वाटले आणि धम्मप्रचाराच्या कामास सुरूवात करावी असे वाटले. विचार मनाना भावला लिखाणाचे अंग नोकरीत असल्यापासून आहे, धम्मासंबंधी मला पटलेल्या लहान विषयावर आधारित बाबी पुस्तकरूपाने समाजास देणे ही योजना आहे. भगवंताच्या सुत्तातील अर्थ मला समजला तसा मी मांडला आहे, अर्थात माझ्या आचरणाला धर्म मी सांगतोय. मला लेखक व्हायचे नाही. धम्माच्या आचरणाद्वारा प्रचार करावयाचा आहे. त्यासाठी माझ्या बुध्दीनुसार, आकलनानुसार मी प्रयत्न करण्याचे धाडस केले आहे व ते पुढेही चालू ठेवणार आहे. प्रोत्साहन मिळाल्यास माझाही हरूप वाढेल व पुढील काम विनाविलंबाने करीन. जयभीम! उत्तमराव सोनवणे