मागील अंकावरून निगडीत करतो. कोणा व्यक्ती अथवा विचारांवर आपण प्रेम करित असू - आपणांस आवडत असेल तेंव्हा ते पकडूनच ठेवल्यास दु:खच दु:ख कारण सर्व अनित्य आहे. परिवर्तनशील आहे, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू निश्चितच आहे. दु:ख निर्मितीची सत्ये ओळखून त्याचा धैर्याने सामना करणे म्हणजे दु:ख मुक्त होणे. ७) जीवन अपवित्र करण्यापासून मुक्तता : जीवन अपवित्र, लाभ-हानी, मान-अपमान, प्रशंसा-निंदा, सुख-दु:ख या लोकधर्माच्या प्रार्दुभावामुळे होते. यामध्ये गुरफटून न जाता त्यांची उपेक्षा करणे चांगले, त्यांना समूळ नष्ट करावे. अरूची, अविद्या, आसक्ती, व्देष, तृष्णा, अपवित्रतेत भर टाकतात. यांचे समूळ उच्चाटन उपेक्षाव्दारा केल्यानेच संबोधीचा मार्ग प्रशस्त होतो. ८) अढळ शांती व सुरक्षितता प्राप्त करणे : जीवन सतत बदलत असते, परावर्तीत होत असते या परिवर्तनामध्ये असंतोषजन प्रवृती विरूध्द झगडत असते; त्यातूनच ते निर्वाणाच्या सुख-शांतीकडे वाटचाल करते. निर्वाणाचा आनंद त्यानंतर कमी होतच नाही. हीच परमशांती व सुरक्षा प्राप्त करण्यास या महामंगल सूत्ताचे प्रयोजन आहे. एके समयी भगवान श्रावस्ती जवळ अनाथपिण्डिकाच्या जेतवनात राहात होते. तेंव्हा रात्र संपत आली असता एक क्रमश:
बुध्द वचने